Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020
कुबेर तुम्हारा चुक्याच.. तुम्हाला सरस्वतीचा वरदहस्त आहे, तुम्ही त्या ब्लॉगमधील विचार तुमच्या शब्दांत लिहू शकत होतात हे एक आणि तुम्ही तुमच्या विचारांमुळे तुमचे पाठीराखे गमावलेत हे दुसरे.इथे चोरी गुन्हा ठरु शकतो पण संघटित दरोडेखोरी कौतुकास पात्र ठरते.       आमचे एक काका, तुमच्या सारखेच सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले. त्यांना आवडलेले लिखाण स्वत:च्या नावावर पोस्ट करतात कोणताही कॉपी पेस्टचा उल्लेख न करता. त्यांचे वाचक कौतुक करतात त्या कौतुकाचा सुहास्य वदनाने स्विकारही करतात. काही दिवसांनी तीच पोस्ट दुसऱ्या कोणी शेअर केली की गदारोळ होतो, कोणीतरी या काकांना टॅग करतं,ते येतात स्माईल देतात,निघून जातात.      एव्हाना ती पोस्ट संघटितपणे या काकांच्या मांडीवर बसवली जाते,या भानगडीत कधीकधी ओरीजिनल पोस्टकर्ताही झोडला जातो.      काका लाईक-कॉमेंट मिळाली म्हणून खुष, वाचक कसा न्याय केला म्हणून खुष आणि हा सर्व गदारोळ होतो तो एक मोठी चोरी असलेल्या फेसबुकवरून.      कुबेर तुमचे चुकलेच तुम्ही पाठीराखे जपले नाहीत.
चंद्राने लाजून लपावे असा तो चेहरा आहे. मेघांनी महिरप मांडावी असा तो चेहरा आहे. दामिनीने चित्र रेखाटावे असा तो चेहरा आहे. भास्कराने पहाट उजळावी असा तो चेहरा आहे.