पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय वेळ देऊनही मुहूर्त टाळायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय दोन थेंब शिंपडून लाईक कॉमेंट्स वाट पहायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय आकाशाचा अर्थ लावत भूमीला कोसायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय भरलेलं आभाळ सोडून वाऱ्यासंग धावायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय नात्यांसारखाच आता अधांतरी रहायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय एकीकडे भरुन येवून दुसरीकडे बरसायला लागलाय. -----अभय बापट ३०/०६/२०२६