किती अंतर चालल्यानंतर येतो सुगंध नात्याला किती अंतर चालल्यानंतर भेटतो आपण स्वतःला. समजून घेतले कोणाला तरच येतात व्यथा कवेत किती अंतर चालल्यानंतर जाणतो आपण बापाला. चुकांमधून शिकत शिकत घडत जातो आपण किती चुका केल्यानंतर जाणतो आपण सत्याला. दूर राहून प्रेम वाढते बोल अनुभवी जगाचे किती दूर गेल्यानंतर स्मरतो आपण मातीला. सर्वांभुती परमेश्वर मानतो आपण गीतेला किती सोबत चालल्यानंतर विसरतो आपण जातीला. ---अभय बापट. ०६/०९/२०२५