येक कथा स्मरली. आप्पांनी "मोगरा फुलला" मध्ये शब्दबद्ध करोन ठेवलेली....... " येक बापुडा अथांग डोही पोहायास उतरला.पाणी तुटेना,पार लागतां दिसेना. बुडतों ऐसें देखोन त्याणे देवतास्मरणास प्रारंभ केला. आगोदर मारुतीरायास सांकडें घातलें, कीं हनुमन्ता, तुजविणें या दुस्तरांतून कोण पार पाववील ? मारुतीरायांनें गाऱ्हाणें आइकलें, तो उठिला.गदा पेलिली.पुच्छ आवरिलें.आता तो निघणार, तो घाबरा झालेल्या त्या बापुड्यानें मारुतिरायास त्यागोन आदिमितेचे धांवणे केलें, कीं भगवती ! आता तुझीच आस. मारतिराया स्वस्थानी बैसला. आंबा पदर सांवरोन उठिली, तिणें आपल्या वाहनाचें स्मरण केलें. आयाळ सांभाळीत सिंह येवोन मातेपुढती उभा राहातो, तोंवरी अंबेच्या कानीं विव्हल स्वर पडिला, की खण्डेराया,या निकर क्षणी त्वां तरी मज दिनास उद्धरावेंस ! आणि. खण्डेराय आपल्या अश्वावर बैसोन डोहाशीं जातो, तों त्यास केवळ बुडबुडे दिसले !" ये वाचोनी माझ्या मनी येक कथा स्फुरली...... "कोणे एके काळी, जगता वरी येका व्हायरसची छाया पडली. येक बापुडा मनोमनी घाबरोन गेला, हवालदिल जाहला.त्याने होमिओपॅथीश्वराचा धावा ...