Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

एहसास हो तुम

तुम एक ऐहसास हो तुझे कैसें बयां करु। खुशीयों की खुशबू हो तुम तुझे कैसे जुदा करु।। तुम मेरी अपनी हो तुम्हे कैसे भुला करु। मेरी सांसें हो तुम तुम्हे कैसे जुदा करु।।

भ्रष्ट आचार-भ्रष्टाचार

भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्या मनात टोकाचा द्वेष असतो आणि आपण तो वेळोवेळी व्यक्त करतो.      भ्रष्टाचार हा फक्त पैशाचा अपहार एवढ्यापुरताच मर्यादित असतो आणि तो सुद्धा सरकारी पैशाचा अपहार अशी आपली ठाम समजून असते.       भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार, चुकीची वागणूक. आपणही कित्येकवेळा असे वागत असतो. कंपनीतली स्टेशनरी घरी नेणे, बस-रेल्वेने प्रवास करुन टॅक्सीचे बिल सादर करणे, आजारपणाचे खोटे सर्टिफिकेट सादर करणे.         खुप लांब कशाला जायचे, मराठी माणसाच्या घराघरातले म्हणून बिरुदावली मिरवणारे कालनिर्णय दोन दिवस पुर्वीपासूनच सोशल साईटवर वरुन फिरु लागलेय. जे दुर्मिळ नाही,खेडोपाडी कुठेही उपलब्ध होवू शकणारे होवू शकणारे, ३०/३५ रुपयांना सहज मिळू शकणारे हे कॅलेंडर, बेकायदेशीरपणे स्कॅन केलेले ते पण शासनाने बंदी घातलेल्या कॅमस्कॅनरच्या सहाय्याने हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच.        चला आपणतरी कालनिर्णयकर्त्यांच्या अखंड प्रयत्नांचे, सातत्याचे कौतुक करुया.      आपल्या लोकल उत्पादनाच्या वितरणातील भ्रष्टाचार निपटून काढूया. ...
या जगात चांगलं आणि मनासारखं जगणं कुणी भेट म्हणून देत नाही !  ते आपणच स्वतःला घडवत मिळवावं लागतं. अश्या प्रयत्नांची सुरुवात कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी करता येते ! अगदी या क्षणापासून !!! (लोकसत्ता)

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

शेर

माझा जीव अंतरी का रडत आहे आरसा का अजून हे लपवत आहे मी किती केले प्रयत्न करण्या सिद्ध अजूनही स्वत:शीच झगडत आहे.
॥ स्वामी ॥ आपल्या बुद्धी पेक्षा जास्त  हुशार आहोत असे भासवण्याचा  प्रयत्न कधीही करू नये.  कारण जेव्हा सत्य  उघड होते तेव्हा फक्त  तुमच्या बुद्धीवर नाही तर  तुमच्या खरेपणावर,  तुमच्या खऱ्या भावनांवरही  भलेमोठे प्रश्नचिन्ह  कायमस्वरूपी चिकटते.

पसारा.....

      पसारा शब्द सर्च केल्यावर गुगल आज अप्सरा संबंधी रिझल्ट का दाखवत असेल. गुगलपण सोशल साईट्सच्या आहारी गेलं असावं कदाचित.        व्हॉट्सअप-फेसबुककरांना अशीच सवय असते. तुलना आणि उपमा याशिवाय त्यांची एकही पोस्ट लिहून होत नाही. नात्याला झाडाची उपमा देतील, प्रेमाला पावसाची, चेहऱ्याला चंद्राची    गुगलही त्यांच्याच रंगात रंगले असावे.    अप्सरा आणि पसारा यात एक साम्य आहेच. अप्सराही हवीहवीशी वाटते पसाऱ्यासारखी आणि तरीही सर्वसामान्य माणसाला तीला आयुष्यभर सांभाळत बसणे अशक्यच, पसाऱ्यासारखेच.    हव्याहव्याशा वाटणाऱ्या पसाऱ्याला कधीतरी स्वत:पासून दूर लोटावेच लागते, मग तो पसारा जमवलेल्या वस्तूंचा असो वा जपलेल्या दु:खद आठवणींचा.    अगदी तसंच आपल्या स्वप्नातल्या अप्सरेला दुर सारुन आपल्या आयुष्यातील नवदुर्गांच्या सहवासात रममाण व्हावेच लागते.    हेच तर आयुष्य आहे.

आठवण

आठवणींचा चातक पक्षी तिच्या नावा भोवतीच घुटमळतो, रित्या झालेल्या डोळ्यांनी तिच्या पाऊलखुणांची चाहूल घेतो.