Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

संस्कार

पुलंनी एका प्रस्तावनेत लिहीले आहे," पैसा येताना आपले चारित्र्य घेवून येतो".     तसेच शब्द उमटताना आपली संस्कृती घेवून येतात.     माणसं येताना संस्कार घेवून येतात,जसे दुधापासून तुप बनताना वेगवेगळे संस्कार त्याच्यावर घडतात आणि त्यावर त्याचे गुण ठरतात,त्याच प्रमाणे माणसावर जन्मापासून सतत आजूबाजूच्या लोकांकडून संस्कार घडत असतात.     माणसाला गुण-अवगुण त्यापासून प्राप्त होतात. माणूस घडतो किंवा बिघडतो ते या संस्कारांमुळेच.

आयुष्याचा अर्थ

आयुष्याचा अर्थ शोधण्याचा कधीही प्रयत्न करु नये, असंख्य निरर्थक गोष्टींचे गाठोडे म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे अडगळीची खोली. शेकडो शोधू तेव्हा एक अल्हाददायक निघते. 

शब्द

एकाकी

एकाकी जगणाऱ्याचे दु:ख ही  त्याचे स्वत:चे नसते, ते सुद्धा दुसऱ्याच्या सुखाची पाऊलवाट शोधत असते. इमेज आंतरजालवरुन साभार