मी आणि ती मला कविता आवडतात, ती स्वत:च एक कविता, ओठांवर रेंगाळणारी. मी तर शब्दांचा भुकेला ती स्वत:च एक शब्द, मौनालाही अर्थ देणारा. मी भावनांवर हेलकावणारा, ती स्वत:च भावना, शांत सागरालाही भरती आणणारी. मी अनर्थाचाही अर्थ शोधणारा, ती स्वत:च अर्थ, रिक्ततेलाही अर्थ देणारी. मी अर्ध्यावर अडकलेले विरामचिन्ह , ती स्वत:च पुर्णविराम,अपुर्णतेला पूर्णत्व देणारी.