मी आणि ती
मला कविता आवडतात,
ती स्वत:च एक कविता, ओठांवर रेंगाळणारी.
मी तर शब्दांचा भुकेला
ती स्वत:च एक शब्द, मौनालाही अर्थ देणारा.
मी भावनांवर हेलकावणारा,
ती स्वत:च भावना, शांत सागरालाही भरती आणणारी.
मी अनर्थाचाही अर्थ शोधणारा,
ती स्वत:च अर्थ, रिक्ततेलाही अर्थ देणारी.
मी अर्ध्यावर अडकलेले विरामचिन्ह ,
ती स्वत:च पुर्णविराम,अपुर्णतेला पूर्णत्व देणारी.
Comments
Post a Comment