बोलून सांगण्याचा प्रयत्न व्यर्थ होता मुक राहण्यातच थोडासा स्वार्थ होता. पोळले होते पाय तापल्या रस्त्यावरती थोड्याशा सावलीला तेव्हाच अर्थ होता. कृतज्ञतेने जपली आठवण सावलीची तिथे माझा देव आणि तिथे परमार्थ होता. नांदले होते रामराज्य कधी आपल्या इथे मनातला राम तेव्हा स्वतंत्र आणि समर्थ होता. -----अभय बापट ११/०१/२०२४