असेच एकट्याने चालू अजून थोडे नवीन वळणावरुन, चालू अजून थोडे. धरुन आशा मनी आणि स्वप्ने उराशी नव्या उमेदीने,चालू अजून थोडे. कशाला हवे सोबतीला अजून कोणी घेवून आठवणींना, चालू अजून थोडे. सावलीला नसते ओळख कधी कुणाची पांघरुन उन्हाला, चालू अजून थोडे. काट्याकुट्यांची करुन सवय घेवू रक्ताळू दे पावलांना, चालू अजून थोडे. सोडून पायवाट चालू पुन्हा नव्याने घेरु दे श्वापदांना, चालू अजून थोडे. उतरुन रणात जिंकू किंवा हारु ही लढू या निश्चयाने, चालू अजून थोडे. ---- अभय बापट १२/०७/२०२४