Skip to main content

माणसं --- विजय तरवडे

ओळख पुस्तकांची...

  माणसं---- लेखक विजय तरवडे

         ही माणसं,तुमच्या आमच्यातली, आठवणीत डोकावून पहायला लावणारी.ही वल्ली नाहीत, ही अरभाटही नाही कारण ही आहेत खरीखुरी माणसं आपल्यातील, आपणचं.
                      श्री. विजय तरवडे यांची ही माणसं आपल्याला आपल्या भुतकाळाची आठवण करुन देतात. काही चुका, काही आनंदाचे क्षण, 
आपल्या तरुणपणातील न विसरता येणाऱ्या माणसांचे पुन्हा स्मरण करुन देतात.
                     खुपपुर्वी ललित साहित्य आवडीने वाचले होते. नंतरच्या काळात रहस्यकथा,साहसकथा,भयकथा, विज्ञानकथांची पारायणे करुन झाली.
                       पुन्हा नव्याने ललित साहित्य आणि व्यक्तीचित्रांच्या मोहमयी दुनियेत ज्यांनी बोट धरुन फिरवून आणले ते रविंद्र पिंगे इथे आहेत. जयवंत दळवी इथे आहे. सहसा दुर्लक्षित राहीलेले सुहास शिरवळकर ज्यांच्या बहुतेक सर्व साहित्याची पारायणे पुन्हा पुन्हा केली ते आनंदयात्री सुहास शिरवळकर इथे आहेत आणखीन काय हवे.
                     श्री. विजय तरवडे यांनी इथे एका ठिकाणी लिहिले आहे," आपल्याही आयुष्यात अशीच भली-बुरी माणसे येतात, चांगली वाईट भूमिका पार पाडतात आणि भूमिका संपली की विंगेत जातात. आपण वाईट लोकांना हाकलू शकत नाही नि चांगल्या लोकांना थांबवू शकत नाही. चांगल्या लोकांच्या स्मरणाने फक्त व्याकूळ होऊ शकते.
                       अशी व्यक्तीचित्रणं आपल्याला भल्या माणसांच्या भलेपणाची आठवण करुन देतात आणि खोट्या माणसांच्या खोटेपणाची ओळखही करुन देतात.
  ---अभय बापट
०५/०७/२०२४
               

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४