योगेश्वरी असे म्हणतात की देवीचे पहिले नाव त्रिपुरासुंदरी, ती उपवर झाल्यावर परळी येथील वैद्यनाथाची निवड केली गेली. त्रिपुरासुंदरीस योग सामर्थ्य असल्याने ती आपले व वैद्यनाथाचे पूर्वीचे जन्म जाणून होती. त्यानुसार देवी पार्वती रुपात असताना तिचे महादेवाशी लग्न झाले. त्यावेळचा किस्सा तिला आठवला.तो रामायण कालातला. रावणाने सीतेचे अपहरण केले, रामाची अवस्था केविलवाणी झाली ती पाहून पार्वती महादेवांना म्हणाली,"ज्याचा पूर्णब्रह्म म्हणून तुम्ही उल्लेख करता त्याला आपली बायको कुठे आहे हे माहिती नसावे,त्याने केविलवाणे का व्हावे ?" महादेव म्हणाले रामाने मानवी देह धारण केलाय म्हणून तो भावनांचे खेळ खेळतोय. पार्वतीने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवलेले व व्याकुळतेने सीतेला हाका मारणा-या रामासमोर ती सीता बनून आली,लक्ष्मण फसला पण राम म्हणाला,"माते कशाला हे श्रम घेतलेस?"पार्वतीचा गर्व परिहार झाला पण तिला सीतारूपात पाहिल्याने भगवान महादेवाने तिच्याकडे पत्नी म्हणछन पहाणे बंद केले, या प्रसंगाची तिला आठवण होती म्हणून ती वैद्यनाथाशी विवाहास तयार नव्हती. त्रिपारुसुंदरीने ठरवले कि अविवाहीत राह...