Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

सहजखुण-शांताबाई

रसग्रहण,मला कधीही न जमलेला एक साहित्यप्रकार. कविता हा खरंतर अत्यंत आवडणारा प्रकार,पण मला साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलेल्या कवीताच जास्त भावतात. क्लिष्ट शब्दांची कलात्मक मांडणी मला कधीच आवडत नाही,कदाचित लोकांनासुद्धा म्हणूनतर आवडत्या कविता सांगा असे म्हटले कि पटकन बहीणाबाई,शांता शेळके,मंगेश पाडगांवकर,कुसुमाग्रज,बोरकर यांच्याच कविता आपोआप तोंडातून बाहेर पडतात. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचे रसग्रहण असावे का,कदाचित मराठी साहित्यातील ते पहिले रसग्रहणही असू शकेल. कवीला शब्दसृष्टीचा ईश्वर म्हटले जाते त्यांने निर्माण केलेले एक-एक काव्य मला त्या अनोख्या निसर्गातील झाडावर लगडलेले फळच वाटते,स्वत:च्या हाताने वेचून काढावे,मनमुराद रस चाखावा,त्या काव्यातील शब्दांच्या खेळाचा गोडवा तोंडात घोळवत ठेवावा. रसग्रहण हे मला कोणीतरी तयार करून दिलेला रस वाटतो.ग्रेस यांच्या एकेका कवितेचे किती विभिन्न अर्थ काढले जातात हे पाहिले की मलातरी एकच वाटते कविता आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा मगच त्या कवीतेचे रसग्रहव वाचावे. शांता शेळके यांच्या सहजखूण कविते...

सहिष्णू आणी असहिष्णू

एका दिवसाची शोभा सर्वांना सहिष्णु बनवते किंवा खरं सांगायचे तर जरा जास्तच असहिष्णु बनवते. शाब्दिक कोलांट्या उड्या मारण्याच्या स्पर्धेत सर्व मेडल्स आपल्यालाच मिळू शकतील याची खात्री मागील काही दिवसात पटली. आपण जर जेवढे दाखवतो तेवढे सहिष्णु असतो तर क्रिकेटपटूंच्या घरांवर हल्ले झाले नसते,त्यांच्यावर कमरेखालचे वार झाले नसते,त्यांच्या जवळच्या मुलींबद्दल अश्लिल विनोद जन्माला आलेच नसते. पंतप्रधान मोदी म्हणाले,"दिल जीत के आना" सर्वजण काल पासून फक्त तेवढेच म्हणतायत. खरंच त्या खेळाडूंपैकी कितीजण भारतीयांचे मन जिंकून गेले ऑलिंपिकला खेळायला गेलेत. हॉकीमध्ये गटबाजीनी कळस गाठलाय,टेनिसमध्ये हेवेदावे आणी जळावू वृत्ती आमचे भारतीयत्व ठळकपणे नजरेसमोर आणतेय.कुस्तीमध्ये आपल्या स्पर्धकाला नामोहरम करण्यासाठी,आयुष्यातून उठवण्यासाठी गुन्हेगारीकृत्य केले जातेय. खेळांना राजकारणी लोकांपासून दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अच्छे दिन येण्यासाठी खेळ,राजकारण,सहकार या क्षेत्राला लागलेली राजकारण्यांची किड नष्ट...

ते आणी आम्ही

आम्ही काही बोललो तर ती निव्वळ पोपटपंची ते बोलले तर ती मात्र सत्याची पाठराखण. आम्ही काही बोललो तर ती बाष्कळ बडबड ते बोलले तर मात्र प्रचंड अभ्यासू मत.