एका दिवसाची शोभा सर्वांना सहिष्णु बनवते किंवा खरं सांगायचे तर जरा जास्तच असहिष्णु बनवते.
शाब्दिक कोलांट्या उड्या मारण्याच्या स्पर्धेत सर्व मेडल्स आपल्यालाच मिळू शकतील याची खात्री मागील काही दिवसात पटली.
आपण जर जेवढे दाखवतो तेवढे सहिष्णु असतो तर क्रिकेटपटूंच्या घरांवर हल्ले झाले नसते,त्यांच्यावर कमरेखालचे वार झाले नसते,त्यांच्या जवळच्या मुलींबद्दल अश्लिल विनोद जन्माला आलेच नसते.
पंतप्रधान मोदी म्हणाले,"दिल जीत के आना" सर्वजण काल पासून फक्त तेवढेच म्हणतायत.
खरंच त्या खेळाडूंपैकी कितीजण भारतीयांचे मन जिंकून गेले ऑलिंपिकला खेळायला गेलेत.
हॉकीमध्ये गटबाजीनी कळस गाठलाय,टेनिसमध्ये हेवेदावे आणी जळावू वृत्ती आमचे भारतीयत्व ठळकपणे नजरेसमोर आणतेय.कुस्तीमध्ये आपल्या स्पर्धकाला नामोहरम करण्यासाठी,आयुष्यातून उठवण्यासाठी गुन्हेगारीकृत्य केले जातेय.
खेळांना राजकारणी लोकांपासून दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
अच्छे दिन येण्यासाठी खेळ,राजकारण,सहकार या क्षेत्राला लागलेली राजकारण्यांची किड नष्ट केली पाहिजे.
एखाद्या दिवशी शोबाजी करत टोचली गेलेली लस आपल्याला संपुर्ण सहिष्णुता नाही देवू शकत.

Comments
Post a Comment