यमुनेकाठचा ताजमहाल प्रेमिकांच्या प्रेमाचे प्रतिक. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ हुसेनमियाँ नावाचा काळा,किडकिडीत,दाढीचे खुंट वाढलेला माणूस बसलेला असतो.
काही वर्षांपूर्वी भारताचे राष्ट्रपती ताजमहाल भेटीला आले असताना या माणसाने त्यांच्या समक्ष शेणाचा गोळा ताजमहालच्या भिंतीवर उडवला.नंतर एव्हरेस्ट जिंकल्याच्या आविर्भावात हुसेनमियाँ सांगायचा," मैने तो ताजमहालपें गोबर फेंका था।बहोत मार खाया था,पर अपना नाम तो हुआ।"
अशी शेकडो विघ्नसंतोषी माणंस आपल्या अजूबाजूला असतात,जी आपल्या आनंदासाठी काहीही वाईट गोष्टी करत असतात.
आपण खरंतर या वाईट वाईट माणसांचा विरोध केला पाहिजे,द्वेष केला पाहिजे,पण जो पर्यंत ही माणसं शेजा-यांच्या घरावर शेण फेकतायत तो पर्यंत आपण मजा घेत राहतो पण शेणांनी भरलेले हे हात कधीतरी आपल्या घराकडे वळणारचं असतात याचे भान आपल्याला नसते.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment