Skip to main content

शेंडी जानव्याचे हिंदुत्व

जेवढे 'चिकू मारवाडी' जातीय,
'कंजूष कोब्रा' जातीय
तेवढेच 'शेंडी जानव्याचे हिंदुत्व' जातीय आहे.
ही एक वृत्ती आहे,अहंकाराची.
जेव्हा एखादा कोणी म्हणतो "कुराण हेच सर्वोच्च्य आणि तेच एकमेव" हीच ती वृत्ती.
जेव्हा कोणी म्हणतो" बायबलच्या बाहेर दुसरे काहीच नाही" ती वृत्ती हीच.
जेव्हा कोणी म्हणतो," वेद आणि पुराणे यात सर्व विज्ञान दडलेले आहे आणि पाश्चात्यांनी ते तीथूनच उचलेले', ती वृत्तीही हीच.
काल परवा पर्यंत ज्या माणसाला सर्वसामान्य भारतीय महात्मा,साबरमतीचा संत म्हणत होता त्याची प्रतिमा उद्ध्वस्त करुन त्याला देशद्रोही आणि धर्मद्रोही ठरवणारी वृत्ती तीही हीच.
एक संघटना,एक पक्ष देशभक्त बाकी सर्व देशद्रोही आणी त्या पक्षाची सेवा करणे म्हणजेच देशसेवा आणि त्याग असं समजणारी वृत्ती ती सुद्धा हीच.
अगदी परवा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले," राज्यघटना सर्वोत्तम आहे आणि ती बदलण्याचा कोणताही प्रयत्न नाही" इथे ही दिसते ती हीच वृत्ती,खरे म्हणजे राज्यघटना ही आदर्श आचारसंहिता,देशासाठी,जनतेसाठी आणि ती देशाच्या,जनतेच्या सुरक्षेसाठी,समृद्धीसाठी,विकासासाठी अंगीकारली जाते,आज पर्यंत त्यात कालानुरुप बदल केले गेले आहेत पण तीला अपरीवर्तनीय समजणे ही कट्टरता म्हणजेच,"शेंडी जानव्याचे हिंदुत्व" हिंदुसमाज कधीच या शेंडी जानव्यापासून आणी या समाजातील कट्टरते पासून कधीच कोसो दूर गेलाय आणि म्हणूनच या उपखंडात जन्मलेला हिंदू हा एकमेव समाजच सर्वात पुढारलेला,पुरोगामी आणि आधुनिक आहे.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४