मला ही आता
वाटू लागलय
आपणही लोकांसारखं जगावं,
बाकी सर्वांना,
अनफॉलोकरुन
स्वतःच स्वतःचं
गाणं गावं.
दुस-यांच्या मोजपट्टीने
मोजण्या पेक्षा,
स्वतःच्या वितीला
फुट म्हणावं.
दुस-यांच्या स्वप्नात
रमण्यापेक्षा,
आपल्या स्वप्नाला
चल ये म्हणावं.
जे आवडतात त्याच्या
सोबत रहावं,
जे आवडत नाहीत त्यांना
चल फूट म्हणावं
आपणही आता
आपल्या सारखं जगावं,
मुखवट्यांच्या या जगात
आपणही मुखवट्यांचं
पिक घ्यावं.
लोकांसारखं
जगता जगता,
आपणही एकदिवस
लोक व्हावं.
Comments
Post a Comment