एखादी काजळी धरलेली दिव्याची काच,पुन्हा पुन्हा काजळी धरणार हे माहिती असून साफ करणे, हा कर्मयोग.
आपण जे फडके वापरतो ते स्वच्छ असावे,मलिन वस्त्राने काच साफ न होता आणखीनच खराब होते हे समजून घेवून कर्म करणे हा- ज्ञानयोग.
लोकांना स्वच्छ उजेड मिळावा,त्यांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून संपूर्ण ज्ञाना सह जाणीवपूर्वक कर्म करत,काच साफ करत राहणे हा- भक्तियोग.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment