शब्द नाही, भाव नाही,
अनुभूतीचे नाव नाही,
मांडा म्हणतात यावर काही
लिहीणार काय कप्पाळ ?
आस नाही,भास नाही,
व्यासंगाचा ध्यास नाही,
मांडा म्हणतात यावर काही,
लिहीणार काय कप्पाळ ?
येणे नाही, जाणे नाही,
अनुभवाचे नाणे नाही,
मांडा म्हणतात यावर काही,
लिहीणार काय कप्पाळ ?
सुर नाही,ताल नाही,
संगीताचे ही ज्ञान नाही,
मांडा म्हणतात यावर काही,
लिहीणार काय कप्पाळ ?
धीर नाही, धर्य नाही,
समजून घ्यायचघ सवय नाही,
मांडा म्हणतात यावर काही,
लिहीणार काय कप्पाळ ?
भक्ती नाही,भाव नाही,
देवघराचे नाव नाही,
मांडा म्हणतात यावर काही,
लिहीणार काय कप्पाळ ?
Comments
Post a Comment