ती जन्माला आली तेव्हा
शितल गारवा पसरला,
तिच्या मुग्ध हास्यातून
पारीजात बरसला.
ती जन्माला आली तेव्हा
आनंदाची बरसात झाली,
तिच्या गोड बोलण्यातून
शब्दमौतिकांची उधळण झाली.
ती जन्माला आली तेव्हा
आपुलकीची लाट आली,
तिच्या प्रेमळ हृदयातून
प्रेमाची बरसात झाली.
Comments
Post a Comment