काट्यावरती तोल तनूचा
असा सावरु नको
ताई तू उगाच घाबरु नको.
वाटीमध्ये चिवडा-लाडू
घास बर्फीचा हवा
ताई तू बनव फराळ नवा.
डोळ्यामधूनी भाव तृप्तीचा
येवू दे जन्माला पुन्हा
ताई खव्याचाच लाडू हवा.
कोण येते पुन्हापुन्हा
घेवून जन्मा नवा
ताई पोटभरा अनरसा खावा.
काट्यावरती तोल तनूचा
असा सावरु नको,
ताई तू उगाच घाबरु नको.
---- अभय बापट
०८/११/२०२३
Comments
Post a Comment