मानू नकोस देव टोळीस दानवांच्या
तेवढा सीधासाधा त्यांचा स्वभाव नाही.
येणार ना कुणीही मदतीस मानवाच्या
पैशाशिवाय कशाचा तेवढा प्रभाव नाही.
घेवून घाम हाती किती फोडशील टाहो
कष्टास आता इथे थोडाही भाव नाही.
नको लावूस ठिगळे झोळीस फाटक्या या
आता मनात शिल्लक मानवतेचे नाव नाही.
माया, कपट यांचा आता इथे बोलबाला
मरण्याशिवाय आता कोणता उपाव नाही.
------ अभय बापट
२९/०३/२०२४
Comments
Post a Comment