रेखू नकोस रेखा डोळ्यात काजळाची
आधीच वार त्यांचा जिवघेणा फार आहे.
कशी समजून घ्यावी भाषा इशाऱ्याची
नजरेस तुझ्या बघ कमाल धार आहे.
मेघांची सावली ही देहास ऊब देते
आता पाघळण्याचा माझा विचार आहे.
ओठांवर मार्दव्याची लाली कमाल आहे
मौनातूनही सहमतीचा तेथे उच्चार आहे.
शब्दाचाही मांडलास असा छळ आहे
तुझे मुके राहणे हा अनोखा वार आहे.
------अभय बापट
२३/१०/२०२४
Comments
Post a Comment