💐💐... सुप्रभात...💐💐
जीवन एवढे साधे सोपे कधीही नसते,जेवढे सिरियल्स मध्ये दाखवतात,एखाद्याला कोणी नावडते झाले म्हणून लगेच आपण आवडते होवू असे कधीच होत नाही.
रिकामी झालेली जागा लगेच भरुन काढणे हे फक्त हवा किंवा पाणीच करु शकते कारण या दोन्ही गोष्टी जीवनावश्यक असूनही यांना स्वत:चे अशी चव नाही,दुस-याशी एकरुप होणे हाच यांचा गुण.
हाच गुण अंगी बाणवला तर कोणाच्याही मनात जागा निर्माण होवू शकते.
कोणालातरी आपलेसे करणे ही तात्पुरती गोष्ट,आपण कोणाचे तरी होणे हेच शाश्वत सुख.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment