"वाहत्या गंगेत हात धुवून घेणे" याचा अर्थ गेल्या आठ-दहा दिवसात गवसला,काहीजणांनी स्वत:ला पुण्य लाभावे म्हणून ही वाहती धारा जवळ केली तर काही जणांनी स्वच्छता अभियानाचे नावे देत आपला रंगांनी बरबटलेला हात या पाण्यात बुडवून समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला.
वाहते पाण्या त्याच्याशी खेळून गढूळ करण्यापेक्षा ते संथपणे वाहू दिले तर लवकर स्वच्छ होते.
पण मग तीथे मी पणाचा गंड कुरवळायला कसा मिळणार,म्हणून प्रत्येकजण सुसाटल्या सारखा धावत सुटला.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment