मने, लहानपण किती मजेदार असते नाही,दिसणा-या प्रत्येक गोष्टीतून फक्त आनंदच पाझरता आपल्याला दिसतो.
स्वत: लिहीलेल्या पत्रांच्या होड्याकरून त्या होड्यांच्या मैत्रीणींबरोबर स्पर्धा लावणे आणी माझं पत्र आधी पोचले म्हणून टाळ्यावाजवून मैत्रीणीला खिजवणे हाही एक आनंदच.
पतंगाला वाऱ्यावर डोलताना बघून वाऱ्यासोबत धावणे हाही एक आनंदच.
तूला माहितीय का मने, वाऱ्यावर सळसळणारी पाने एक आगळेवेगळे संगीत निर्माण करत असतात किंवा वाऱ्यावर डोलणारी सुंदर फुले समुहनृत्याविष्कार दाखवत असतात पण ते नृत्य ते संगीत परावलंबी असते.
जो पर्यंत वारा वाहतो तो पर्यंतच हा निसर्गाच्या रंगमंचावरचा खेळ चालू असतो.
हा खेळ चालण्यासाठी त्या झाडांचे,त्या फुलांचे भक्कमपणे पाय रोवून उभे राहणे हेच सर्वात महत्वाचे,जो पर्यंत ते झाड भक्कमपणे मुळं रोवून उभं आहे तो पर्यंत त्या पानांचे सळसळणे आणी फुलांचे टवटवीत रंग,मुळाचा आधार गेला की सगळं संपलेच, मने.
माणसांच पण असच असते मने, आपल्या पायावर उभं राहून आपल्या कामातून आपण आनंद निर्माण करु तोच शाश्वत, दुसऱ्याच्या वागण्यातून आपण आनंद मिळवू म्हणून आपण वाट पहात बसलो न तर नशीबी फक्त दु:खच येते.
मने,आपण लहान मुलांना सांगत असतो मोठ्ठ व्हा पण आपण मात्र लहानच राहतो, दुसऱ्यांच्या वागण्यावरून आपला आनंद आणि दुःख ठरवणारे.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment