मने,
सुखाने,समाधानाने जगायचे असेल तर लक्षपुर्वक दुर्लक्ष करायला शिकले पाहीजे.
विश्वासतली सर्वात सुपीक जमीन कुठली आहे ते माहिती आहे का मने ?
ती म्हणजे आपले मन.
या भुमीवर जे बियाणे पडते ते हजारो पटीत आपल्याला परत मिळते.
अनेकजण बियाणे विकायला आपली दुकाने थाटून सदैव तत्पर असतात,मने.रोगट बियाणे,भेसळीचे बियाणे , समृद्ध पौष्टिक धान्याचे बियाणे.
आपले वावर जर कायम सुपीक,समृद्ध राखायचे असेल तर या अयोग्य विक्रेत्यांकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करायला शिकले पाहीजे.
रानवाटामध्ये मारुती चितमपल्ली लिहीतात, " सत्प्रवृत्तीच रोपही चांगल्या झाडांप्रमाणेच हळूहळू वाढत,दुष्ट प्रवृत्तीच तण नेहमीच वेगानी वाढत".
हे तण काढणे हे कॉग्रेस गवत नष्ट करण्याइतकेच कठीण काम असते, म्हणूनच आपल्या मनाच्या सुपीक जमीनीवर हे भेसळीचे बियाणे टाकणारे विचार ओळखून त्यांच्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करायला शिकणे हाच मनाची समृद्धी जपण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे मने.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment