प्रत्येक झाडाचा हिरवा रंग किती वेगळा, काही झाडं अगदी हिरवी साडी नेसून तयार असतात तर काही ओठांवर लावलेल्या लिपस्टिक सारखी पुसटशी लालसर झाक घेवून.
हिरवा चुडा तर जणू कंपलसरीच असावा बहुतेक झाडांना आणि ज्या झाडांना नट्टापट्टा करण्याची हौस आहे ती तर जणू फॅशन शो मध्ये भाग घेण्यासाठी तयार झाल्यासारखी विविध रंगाची फुलं मिरवीत सर्वापुढे उठून दिसतात.
उनपावसाच्या खेळात तर या सर्व झाडांचे सोनसळी सौंदर्य एवढे झळाळून उठते त्याची तुलना फक्त एकाच गोष्टीशी होवू शकते...दिवसभरत आलेल्या स्त्रीच्या सतेज,तृप्त सौदर्याशी.
बघा तरी एकदा निसर्गाकडे,ईश्वरानी आपल्याले किती अमुल्य देणगी दिलीय ते.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment