ग्रुप असावा कुटूंबासारखा
एकमेकांना सांभाळणारा,
अडीअडचणीत प्रत्येकाच्या
मदतीला धावणारा.
एकमेकांचे सुखदु:ख
मनापासून समजावून घेणारा,
अश्रूचा छोटासा थेंबही
अलगद टिपून घेणारा.
सोबत नसेल क्षणाक्षणाला
नसेल प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड करणारा,
पण मनाला पडणारा प्रत्येक पिळ
दूर राहूनही समजून घेणारा.
ग्रुप असावा कुटूंबासारखा
आपला आपला वाटणारा,
आपलेपणाच्या हिरवाईतून
प्रेमाचा झळा झुळझुळणारा.
अवी
Comments
Post a Comment