चिवडा हा खरा आदर्श मित्र, सर्वांना बरोबर घेवून जाणार,लहानथोर हा भेदभाव याच्या जवळ अजिबात नाही. त्याला सोबतील काजू चालतात तेवढ्याच आत्मियतेने तो शेंगदाणे,खोबरं,डाळं याच्यातही रमून जातो.तिखट मिरची,कडू हिंग,गोड साखर,आंबट सायट्रिक अॅसिड,आमचूर पावडर,तुरट कढिपत्ता कोणाशीही त्याचा उभा दावा नाही सर्वसमावेशक आदर्श सहकारीमहर्षी.
चकली आणि अनरस हीे दोन मुलं जरा वेंधळीच असतात,काळ वेळ न बघता अजागळासारखी हसतच सुटतात, किती आंजारावं - गोंजाराव लागतं त्यांना.
लाडू लहानमुलांसारखे एकतर टणटण करीत बसतात नाही तर चिखलात बसलेल्या म्हशी सारखे ढिम्म बसूनच राहतात.
शंकरपाळी बिचारी सर्वात समंजस,एकटे एकटे पोटाच्या गुहेत बिनदिक्कत घुसतात नाहीतर चहाची साथसंगतही हसतमुखाने सहन करतात.
करंजी बिचारी काटकसर या नावाखाली खुळखुळा बनूनच हातात पडते,बिचारी एकेकाळी घरोघरी कंपलसरी असणारी ही मुलगी आता नावडती मुलगी होवून बसलीय.
शेव एकटी येते स्वतंत्रबाण्याने राहते आणि अनेकांना आधार देत खवय्यांना खुष करत असते.
प्रत्येकाची चव वेगळी,रंग, आकार,गंधही वेगळा,जेवढ्या गृहिणी तेवढी अनोखी यांची जातकुळी पण आता दुकानातून यायला लागले घरोघरी आणि व्हॉट्सअप मेसेजेस सारखी निव्वळ फॉर्वर्ड्सची सुरवात झाली.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment