आगस्ता,बेल,शमी,सुरंगी,बकुळ......आणि चंदन.काय साम्य आहे यांच्यात,तर काही नाही पण आज या झाडांना धरणीमातेच्या कुशीत त्यांची हक्काची जागा मिळवून दिली.
परंपरागत प्रत्येकाकडे असणारी ही झाडं आता अस्तंगत होतील की काय अशी साधार भिती निर्माण झालीय कारण आर्थिक गणीतात यांची किंमत निव्वळ शून्य आहे.
चंदनाला तर म्हणे त्याची ओळख असलेला सुवास पंचवीस वर्षांनंतरच प्राप्त होतो पण काही गोष्टी हौस म्हणून,आवड म्हणूनही जपाव्यात नाही का ?
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment