Skip to main content

गळीत पँथर

दलित पँथरच्या उगमाचा धुरळा खाली बसून जमाना उलटून गेला तरी महाराष्ट्रात पँथरच्या जन्माचे पिक फोफवण्याचे थांबतच नाही आहे,अगदी काँग्रेस गवताप्रमाणे.
        अशोक जैन यांच्या डोक्यातून "ललित पँथरचा" जन्म झाला त्यालाही काळ लोटला.
        सोशल साईट्सवर "गळित पँथरचे" पिक दरवर्षी नेमाने घेतले जातेच आहे.
        जैन यांच्या ललित पँथर मध्ये दोन गट होते एक यशस्वी साहित्याला झोडणारा तर दुसरा सत्यकथेचा द्वेष करणारा.
        गळित पँथरमध्ये तीन गट असतात, एक समंजस माणसांचा गट,द्वेष सुरवातीला ठीक आहे नंतर मात्र वेगळा मार्ग चोखळवा असे मानणारा.
        दुसरा द्वेष हाच आपला पाया आहे तो भक्कम ठेवत प्रस्थापितांना झोडणारे.
        आणि तिसरा दोन्हीमध्ये समतोल साधत याचे पण बरोबर त्याचे पण बरोबर बोलत आपला स्वत:चा पाया भक्कम करणारा.
        गळित पँथर मध्ये काहीजण असे असतात ज्यांची बोळवण सर्वसामान्य माणसं "चहापेक्षा किटली गरम" या एका वाक्यात करतात.
        प्रस्थापितांमध्ये नेते अनेकांना दुखावण्याचा यज्ञ अव्यहायतपणे पार पाडत असतात पण या पँथर्समध्ये काहीजणांचे एकमेव ध्येय असते ते म्हणजे या संघटनेचे संचालकपद काही झाले तरी मिळवायचेच,त्यासाठी आपल्या जून्या मित्रांना तोडताना त्यांना काही दु:ख होत नाही.हेच खरे धोकादायक असतात,हेच संघटनेत कलह माजवतात आणि आपली भाकरी भाजून घेतात.
        गळीत पँथर्सच्या समोर उदाहरण असते ते प्रस्थापितांचेच, त्यांचे सर्व गुण-दोष हे घेवून येतात,जरासे मनाविरुद्ध कोणी बोलले की त्याला कबुतर,खबऱ्या,चमचा असे हिणवत बसतात.
         अशी भुसभुशीत झालेल्या जमीनीत आशेचे अंकुर पटकन रुजतात आणि नाराजांच्या या भुमित नवीन संघटनेची जुळवाजुळव सुरु.
         गळीत पँथर्सचे पिक पुन्हा नव्या हंगामात तरारुन वर येते.
    

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४