मुक्यांचे नेहमीच फक्त शोषण होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुकी जास्वंद, ना हिला देवच्या पायांवरती जागा,ना सुशोभित उद्यानांनमध्ये, हिचा उपयोग फक्त लहान मुलांकडून मध शोषून घेण्यासाठीच. जी गोष्ट साध्या कुत्र्याला उमजली सर्वांना समजतेच असे नाही, कुत्राही विनाकारण भुंकत राहतो कारण त्यालाही माहीत असतं आपण शांत राहीलो तर मालक अन्न घालायच विसरेल. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आली ती पाश्र्चात्य संत आदरणीय व्हॅलेंटाईन यांच्या, त्यांनी मुक्यांसाठी एक दिवसच ठरवून दिला, या दिवशी कोणीही मुक्यांनी आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्ती समोर व्यक्त करु शकतो. रा.रा. मार्कआण्णा झुकेनबर्ग यांच्या सहर्ष योगदानामुळे या मुक्यांची ही गाथा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली. मुक्यांचे हे महत्व लक्षात," शंभर करोड इंडीयन व्हॉट्सअप गुळपाडू ग्रुप" तर्फे एक ठरावा बिनविरोध पास करण्यात आला, फेसबुकला जगभर फेसबुक म्हटले तरी सर्वाधिक युझर असलेल्या भारतात त्याचे नाव.................