माझ्या वाचनातील पहिली चुंबन कविता "राम गणेश गडकरी" यांनी १९१२ साली लिहीली," पहिले चुंबन" त्या कवितेचा शेवट करताना ते लिहीतात,
"निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी| मरण सोसावे ।
परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥
त्यानंतर शेकडो कवींनी हा विषय चाखला.
एका अज्ञात कवीने ना.धों. महानोर यांचे शब्द उसने घेवून लिहीले आहे,
" या कवीने
त्या कवीचे
शब्द घ्यावे
आणि कवितेच्या वाऱ्यावरी
स्वार व्हावे
सुटेल मांड तुझी कधी चुकीने
पण कवी म्हणून गावात मिरवावे.
कोणती पुण्ये अशी
आली फळाला
मराठी
मातीतच
जन्मा यावे"
एका अमेरीकन स्टॅडअप शो करणाऱ्या पत्रकाराने ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांना ठणकावून सांगितले होते," जो खेळ आपण कधीही खेळलो नाही,त्याच्या नियमाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही".
तो धागा धरुन आपल्या एका क्रिकेटपटूंने हर्ष भोगले यांना सांगतले," ज्यांनी कधी बॅट हातात धरली नाही त्यांनी खेळाडूला कसे खेळावे हे शिकवू नये."
पण आपल्या जाणत्यांनी लिहून ठेवलेय,
"देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही
म्हणून त्याने आईला जन्माला घातला."
"या छोट्याशा आयुष्यात प्रत्येक ज्ञान स्वत:
आत्मसात करता येत नाही म्हणून गुरुंना जन्माला घातले"
प्रत्येक गोष्ट अनुभवता येत नाही म्हणून देवाने
लेखक/कवींना जन्माला घातले.
म्हणून मी पण खेळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून
गुरुवर्य गडकरी आणि महानोर यांची माफी मागून त्यांचेच शब्द उसने घेवून आजच्या महायज्ञात माझीही एक समिधा अर्पण करतो.
या ओठांनी
त्या ओठांना
दान द्यावे
आणि गात्रागात्रांतून
चैतन्य फुलावे.
कोणती पुण्ये अशी
येती फळाला
रुक्ष ओठांत
तीच्या
डाळींब भरावे.
Comments
Post a Comment