स्पिरीट म्हणजे काय रे भाऊ ? खुप गर्दीमुळे कोरोना रोग पसरतो हे माहीती असून अनावश्यक गर्दी करणे म्हणजे स्पिरीट की खेडेगावात एक किमी.अंतरात ५-६ माणसंच भेटतात माहीती असून मुखलंगोट लावून फिरणे म्हणजे स्पिरीट. जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी मरणारच आहे त्यात काय घाबरायचे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि आपल्याच इथल्या परदेशात खेळायला गेलेल्या खेळाडूंसमोर अन्नाची ताटली लांबून लोटून देणे म्हणजे स्पिरीट. जे भक्तीमार्गात आहेत तेच वाचतील असे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि निसर्गाने/ईश्वराने संतुलन साधण्यासाठी योजलेला उपाय आहे हा असे म्हणणे स्पिरीट. हे जंतूंशी मानवांचे युद्ध आहे आणि ते विज्ञानाच्या सहाय्याने लढू म्हणणे स्पिरिट कि तापमान वाढले की व्हायरस नष्ट होईल या विश्वासावर हातावर हात धरुन स्वस्थ बसणे म्हणजे स्पिरीट. मलाच सर्व समजतं मी मला हवे ते करीन असे उद्दामपणे म्हणणे स्पिरीट कि कोणीली दिलेली चांगले सल्ले मी अंमलात आणीन म्हणणे स...