Skip to main content

मनमोकळ्या गप्पा-मनाच्या मनाशी

मने,
     आठवतय तुला दोन वर्षांपूर्वी तू मला अनफ्रेंड केलेस तेव्हा मी विचारले होते,"एवढी काय गरज होती अनफ्रेंड करण्याची ?
     तेव्ही तू नेहमी सारखेच खुप मोठे लेक्चर ऐकवले होतेस,डिस्कनेक्ट होणे काय, मन:स्वास्थ काय किती अवघड शब्दात सांगायचा प्रयत्न केला होतास. मला अजिबात समजले नव्हते कारण मला ते समजून घ्यायचेच नव्हते,जी गोष्ट मनालाच पटली नाही ती का समजून घ्यायची.
     पण सर्व अवघड गोष्टी सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या, गुरुंचाही गुरु असलेल्या निसर्गाने गेल्या दोन वर्षात हे सुद्धा समजावून दिले.
     
     मने, आपण प्रेमाने बागेत लावलेली,गुलबक्षी, सदाफुली, लाजाळू जेव्हा बागेतल्या बाकीच्या झाडांना गराडा घालून नष्ट करु पाहतात तेव्हा त्यांच्यावर कात्री चालवावीच लागते.
     
     मने,सावरता येत नसेल तर आवर घालावा लागतोच हेच तेव्हा तू सांगत होतील.

     पण तरीही मने डिस्कनेक्ट होणे आणि तोडून टाकणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे नाही का समजले तुला.
     
     मने, आई आपल्या आपल्या अपत्यासोबत नाळ तोडून टाकते ते डीस्कनेट होणे, ती डिस्कनेक्ट झाली तरी आपल्या अमृताचा वर्षाव नाही थांबवत, बाळाच्या विकासासाठी ती डिस्कनेक्ट करते तोडून नाही टाकत.
     
     मने, स्वत:ला टोचणारा काटा स्वत:च्या आनंदासाठी काढून टाकणे, हे तोडून टाकणे, स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्याच्या दु:खाचा विचार न करणे हे डिस्कनेक्ट होणे नव्हे ते तर तोडून टाकणे.
     
     मने, आता मीही शिकलोय, तोडून टाकायला नव्हे सर्व झाडांच्या निकोप वाढीसाठी त्यांना सावरताना स्वत:च्या मनाला आवरायलाही.
     
    मने,  शेवटी तुझ्यासारखा शिकलासवरलेला नाही तर एक साधा शेतकरी आहे.जूनं जपताना नवीन जोडायला आवडतं मला आणि काटे जमा करुन त्यांचा कुंपणासाठी वापर करायला सुद्धा.टोचणारे काटेसुद्धा आपणच जपलेले असतात कधीतरी, आपल्या हौशीसाठीच.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४