Skip to main content

धुलिवंदन- आपली संस्कृती

धुळवड अर्थात धुलिवंदन


बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेच्या ओळी आहेत---

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते पण मनातील राग,द्वेषबुद्धी यावर कोणताही उपाय चालत नाही.

भारतीय संस्कृतीवर कायम एक आरोप केला जातो तो म्हणजे ही संस्कृती भावनांचे दमन करायला लावते पण होळी आणि धुळीवंदन हे याला चोख उत्तर आहे.

होळीच्या दिवशी मनातील राग-द्वेष, किल्मिष होळी पेटवताना व्यक्त करुन त्यांना जाळून,नष्ट करुन मोकळे व्हायचे, आधुनिक मानसशास्त्र हे पण हेच सांगते," भावना मनात दाबून टाकून कुढत राहण्यापेक्षा, त्या व्यक्त करुन त्यांचे ओझे मनावरुन उतरवून टाकणे हा मनाच्या स्वास्थासाठी चांगले असते"

हि संधी होळीच्या रुपाने आपली संस्कृती आपल्याला देते.
होळीच्या वेळेला निरुपयोगी पालापाचोळा,लाकूड फाटा, त्याच बरोबर मनातील अडगळही जाळून टाकायची. दुसऱ्या धुळीवंदनाच्या दिवशी ती राख अंगाला फासून त्या सगळ्या अडगळींपासून निवृत्त व्हायचे, अनेक प्रकारच्या झाडांची ही राख औषधी असते,त्वचारोगांवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

त्याच होळीच्या पेटत्या लाकडांवर पाणी तापवून त्यांने आंघोळ करुन तो अध्याय समाप्त करायचा आणि समोरे जायचे वसंताच्या स्वागताला,निसर्ग वसंतच्या स्वागतासाठी तयार झालेला असतोच आपणही आपल्या मनातील वसंत तसाच फुलू द्यायचा,तसाच रंगू द्यायचा वेगवेगळ्या रंगांनी.
  🌲🥀🌸🏵️🌻🌼💮💮🌼🌻🏵️🌸🌷🌲

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४