Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

फेसबुकच्या भिंतीआडून

      एखादी आई आपल्या गोड, गोंडस,सदृढ बाळाला नटवण्यासाठी नादात शेजारच्या बाळाचे कपडे उसने आणून त्याला नटवते पण त्या नादात ते गोड बाळ बेंगरुळ दिसायला लागते.        तसेच काहीसे फेसबुकवच्या सिद्धहस्त लेखकांचे होतेय.

अक्षय तृतीया

ईगो

   ईगो हा रबरी फुग्या सारखा असतो. जो पर्यंत तो फुगत असतो तो पर्यंत तो स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली झाकला जातो.         आजूबाजूची लोकं तो फुगवण्यासाठी भरीस घालत असतात, पण एक क्षण असतो, फुग्याची आणि ईगोची फुगण्याची मर्यादा संपते आणि तो फटकन फुटतो,तो क्षण टाळता आला तो जिंकला.         एकदा तो फुगा फुटला, निरुपयोगी ठरला की अहंकारामुळे सत्यनाश झाला असे टोमणे तीच लोकं तत्परतेने मारतात.
कालची बातमी खोटी होती  पण त्यामुळेच हातात भरलेली वाटी होती. ज्ञानसुर्यांनो हा धंदा नाही,एक विचार आहे लेखणी नाही,ही तर दुधारी तलवार आहे. कित्येक वेळा मी केला असा अनाचार आहे पण हाय मी ही आज जखामांनी बेजार आहे. वाटते नको होवूया पुन्हा लाचार असे. पण हाच तर माझ्या जगण्याचा आधार आहे.
तुझ्या शब्दांची कविता बघ सजते आहे माझ्या शब्दांचा बोळा तीथेच पडला आहे. झालो आता एका शब्दाला महाग जरी मनात भरलेला सुगंध अजून तसाच दडला आहे. सांडले शब्द मनातले आता जरी इथे तीथे पायदळी तुडवलेल्यात जीव नकळत जडला आहे. आपुलकीच्या लाटा जरी आता खुप दूर गेल्या किनाऱ्याकडे धावण्याचा जोर आता वाढला आहे.