कालची बातमी खोटी होती
पण त्यामुळेच हातात भरलेली वाटी होती.
ज्ञानसुर्यांनो हा धंदा नाही,एक विचार आहे
लेखणी नाही,ही तर दुधारी तलवार आहे.
कित्येक वेळा मी केला असा अनाचार आहे
पण हाय मी ही आज जखामांनी बेजार आहे.
वाटते नको होवूया पुन्हा लाचार असे.
पण हाच तर माझ्या जगण्याचा आधार आहे.
Comments
Post a Comment