तुझ्या शब्दांची कविता बघ सजते आहे
माझ्या शब्दांचा बोळा तीथेच पडला आहे.
झालो आता एका शब्दाला महाग जरी
मनात भरलेला सुगंध अजून तसाच दडला आहे.
सांडले शब्द मनातले आता जरी इथे तीथे
पायदळी तुडवलेल्यात जीव नकळत जडला आहे.
आपुलकीच्या लाटा जरी आता खुप दूर गेल्या
किनाऱ्याकडे धावण्याचा जोर आता वाढला आहे.
Comments
Post a Comment