Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

मेसेज आणि नात्यांचा उत्सव

सर्वात जास्त लिहीला,वाचला आणि फॉरवर्ड केला जाणारा मेसेज विषय म्हणजे नाती, मैत्री आणि विश्वास.          तरीही सर्वात जास्त तुटणाऱ्या गोष्टी म्हणजे नाती,मैत्री आणि विश्वासच.          म्हणजे आपण जे लिहीतो,बोलतो,फॉरवर्ड करतो त्या गोष्टी आपण कधीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही,आपला ठाम अंधविश्वास असतो एक मेसेज पाठवला की सर्वकाही ठिक होवून जाईल.          पण जग एवढे साधे,सोपे कधीच नसते. जो वेळ हे मेसेज पाठवण्यात आपण खर्ची घालतो तोच वेळ ही नाती,मैत्री,विश्वास जपण्यासाठी वापरला तर हे मेसेज वाचण्यासाठी,लिहिण्यासाठी मोकळा वेळ आपल्याकडे शिल्लकच राहणार नाही.          वपु. उत्सव नात्यांचा असा ज्याचा उल्लेख करतात तो उत्सव आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनून जाईल.
गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेले अमूल्य ज्ञान..... डबल स्टँडर्ड अर्थात विश्वातील सर्वात हरामखोर प्राणी. परवाच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल देताना म्हटले, "वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही". आता गंमत अशी आहे, मुलींना/स्त्रीला वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणारा पुरुषच. त्यांच्याकडे क्षणिक समाधानासाठी जाणारा पुरुषच आणि त्यांना गुन्हेगार ठरवणारे पुरुषच. स्वत:च्या पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना अटक केले जाते. पण ग्लॅमरसाठी, वैभव मिळवण्यासाठी,प्रसिद्धीसाठी तेच सर्व काही करणाऱ्या स्त्रीला मात्र, मान,सन्मान,चॅनलचे दरवाजे खुले होतात. दोन्हींच्या पाठी असतो स्वत:चा स्वार्थ साधू पहाणारा पुरुषच.देहाची विक्री करणाऱ्यांचा वापर बुद्धीची/आत्म्याची विक्री करणारा करतो तो पण पुरुष एका अर्थाने वेश्याच असतो. बाईच्या पोटातून जन्म घेणारा. स्वत:च्या स्वार्थासाठी जमेल तसा बाईचा वापर करणारा आणि स्वत:चा वंशाचे बीज ओटीत रुजत घालण्यासाठी बाईच्या कुशीत शिरणारा सुद्धा पुरुषच.  डबल स्टँडर्ड विषारी प्राणी.
म्हाताऱ्यांचे प्रेम आणि अळवावरचे पाणी फक्त दिसते चमकदार पण असते निर्जिव.

मराठी मनाचा राजा

मराठी माणसाच्या मनामनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.       मराठी मुलुखाच्या समृद्धीसाठी,सन्मानासाठी महाराजांना आयुष्यभर लढा द्यावा लागला. परकीयांशी आणि स्वकीयांशीसुद्धा.       हा लढा स्वराज्य स्थापने नंतर तरी थांबेल असे वाटले होते पण तो अविरत चालू आहे.       व्हिक्टोरीया टर्मिनसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नामकरणासाठी  सुद्धा १९९६ पर्यंत वाट बघावी लागली. नशीबाने तेव्हा मराठी लोकांच्या मागणीचा न्याय देणारे समंजस, सद्हृदयी अटलबिहारी वाजपेयी देशाच्या पंतप्रधानपदी होते.       सहार विमानतळाचे नामकरण असो किंवा सहार विमानतळावर पुतळ्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागले. विमानतळ विस्तारीकरणाच्या वेळी महाराज्यांचा पुतळा गोडावून शेजारी उन्हातान्हात उभा केला गेला. त्यावर सावलीसाठी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली.       छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा आंदोलन. नावात महाराज शब्द वापरण्यासाठी आंदोलन.       महाराजांनी ज्याच्या वि...