Skip to main content

मराठी मनाचा राजा

मराठी माणसाच्या मनामनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
      मराठी मुलुखाच्या समृद्धीसाठी,सन्मानासाठी महाराजांना आयुष्यभर लढा द्यावा लागला. परकीयांशी आणि स्वकीयांशीसुद्धा.
      हा लढा स्वराज्य स्थापने नंतर तरी थांबेल असे वाटले होते पण तो अविरत चालू आहे.
      व्हिक्टोरीया टर्मिनसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नामकरणासाठी  सुद्धा १९९६ पर्यंत वाट बघावी लागली. नशीबाने तेव्हा मराठी लोकांच्या मागणीचा न्याय देणारे समंजस, सद्हृदयी अटलबिहारी वाजपेयी देशाच्या पंतप्रधानपदी होते.
      सहार विमानतळाचे नामकरण असो किंवा सहार विमानतळावर पुतळ्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागले. विमानतळ विस्तारीकरणाच्या वेळी महाराज्यांचा पुतळा गोडावून शेजारी उन्हातान्हात उभा केला गेला. त्यावर सावलीसाठी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली.
      छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा आंदोलन. नावात महाराज शब्द वापरण्यासाठी आंदोलन.
      महाराजांनी ज्याच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य खर्ची घातले, ज्या औरंगजेबाने महाराज्यांचे स्वराज्य बुडवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करुन त्यांची हत्या केली त्या औरंगजेबाच्या नावाचे शहर असावे व त्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी सतत अमान्य व्हावी हे दुर्दैव.
      आज जी लोक आग्र्यातील संग्रहालयाच्या नामकरणाने आनंदोत्सव साजरा करतायत त्यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी मदत करावी.
      महाराजांचे किल्ले त्यांच्याच मुलखात बेवारस एकाकी पडले आहेत. गो.नी.दांडेकर आपल्या दुर्गभ्रमणगाथेत लिहीतात,किल्ल्यावरच्या पितळी/पंचधातूच्या तोफांचा निव्वळ त्या गडगडत खाली जातांना येणारा आवाज ऐकण्यासाठी कडेलोट केल्या गेल्या.
      सर्वांत लबाडपणाचा कळस म्हणजे महाराजांच्या राज्यात, जिथे त्यांनी कर्तृत्व गाजवले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या महाराष्ट्रात छत्रपती हे "साडेतीन जिल्हाचे राजे" म्हणून लहान-लहान मुलांना करुन दिली जाणारी ओळख.
      बी मधून उगवणाऱ्या इवल्याश्या रोपाचेच पुढे जावून विशाल वटवृक्षात रुपांतर होते हे न जाणणारी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली हेच महाराजांचे, महाराष्ट्राचे, महाराजांवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाचे दुर्दैव.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४