Skip to main content
गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेले अमूल्य ज्ञान.....

डबल स्टँडर्ड अर्थात विश्वातील सर्वात हरामखोर प्राणी.

परवाच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल देताना म्हटले, "वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही".
आता गंमत अशी आहे, मुलींना/स्त्रीला वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणारा पुरुषच.
त्यांच्याकडे क्षणिक समाधानासाठी जाणारा पुरुषच आणि त्यांना गुन्हेगार ठरवणारे पुरुषच.

स्वत:च्या पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना अटक केले जाते.

पण ग्लॅमरसाठी, वैभव मिळवण्यासाठी,प्रसिद्धीसाठी तेच सर्व काही करणाऱ्या स्त्रीला मात्र, मान,सन्मान,चॅनलचे दरवाजे खुले होतात.

दोन्हींच्या पाठी असतो स्वत:चा स्वार्थ साधू पहाणारा पुरुषच.देहाची विक्री करणाऱ्यांचा वापर बुद्धीची/आत्म्याची विक्री करणारा करतो तो पण पुरुष एका अर्थाने वेश्याच असतो.

बाईच्या पोटातून जन्म घेणारा.
स्वत:च्या स्वार्थासाठी जमेल तसा बाईचा वापर करणारा
आणि
स्वत:चा वंशाचे बीज ओटीत रुजत घालण्यासाठी बाईच्या कुशीत शिरणारा सुद्धा पुरुषच. 

डबल स्टँडर्ड विषारी प्राणी.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४