कपडे बदलून आले जेव्हा सारे कसाई
हंबरेल का हो सांगा प्रेमाने गाय आता.
दारात येऊन उभा रावण जेव्हा होता
झोपेल का घरट्यात सुखाने माय आता.
विश्वास हा विचार तुटून मनात गेला
बांधेल का हो धागा मायेने ताय आता.
नासून गेले बघ ओटीतच दुध सारे
मिळाल का थोडी धगीने साय आता.
चाललो होते रस्ता एकटी सुखाचा
पोळून राठ झाले आगीने पाय आता.
--- अभय बापट
१४/०९/२०२२
Comments
Post a Comment