कोण जाणे कसा हा बदलला देश आहे
वाल्याने घेतला वाल्मिकीचा वेश आहे.
भाव नाही भक्ती नाही प्रेम नाही अंतरी
मुखामध्ये सदाचा रामनामाचा घोष आहे.
पुर्वजांचे गोडवे अन आप्तांना क्लेश आहे
स्वत:पुरतेच जगणे हाच एकमेव उद्देश आहे.
वेचले अमाप सुख ज्या झाडांच्या सावलीत
त्या झाडांना छाटण्याचा नवा आदेश आहे.
-- अभय बापट
१७/०९/२०२२
Comments
Post a Comment