ओठावरती तीळ गालावर खळी आहे
गोडी अमृताची त्यापुढे अधुरी आहे.
गोडवा आहे मुळातच बोलण्यात तुझ्या
कितीही बोललो तरी ही भेट अपुरी आहे.
बघितलेस तू खोलवर डोळ्यात जेव्हा
तेव्हाच समजले माझ्या स्वप्नांना मंजूरी आहे.
घडली जेव्हा नजरभेट पहाटेला जागताना
यौवनाने मुसमुसलेली तू लाघवी सूरी आहे.
कोणासाठी अप्सरा कोणासाठी परी आहे
माझ्यासाठी तू आपली गृहिणीच बरी आहे.
------ अभय बापट
१४/०१/२०२३
Comments
Post a Comment