तुझ्या सूरामध्ये सूर मिसळून हसलो रडलो, तुझ्या सूरावर डोळे मिटून हळूच निजलो. तुझ्या सुरामध्ये पाऊस गातो रेशीम गाणी, तुझ्या सुरानी कळ्या डुलतात धुंद तराणी. तुझ्या सुरामध्ये असे सुगंधी फाया अत्तर. तुझ्या सुरातून इथे जागतो राम निरंतर. तुझ्या सुरासवे होवून गेली मैफल रीती. तुझ्या सुरातून सूर उमटावे शुभंकरोती. तू होतीस तोवर निसर्गात या ऋतू बरवा, तुझ्या पाठी कुठे उरला मनी गारवा. -----अभय बापट १३/०४/२०२६ तुझ्या सुरातून जगण्यासाठी मिळते आशा तुझ्या जगण्यातून लढण्यासाठी दिसते दिशा. कसे सुचावे तूझ्या सुरावीना शब्द कुणाला. तुझे सूर जणू शब्दांसाठी अहेव कोंदण. अभय बापट १५/०४/२०२६