Skip to main content

कुलस्वामीनी योगेश्वरी

योगेश्वरी
असे म्हणतात की देवीचे पहिले नाव त्रिपुरासुंदरी, ती उपवर झाल्यावर परळी येथील वैद्यनाथाची निवड केली गेली. त्रिपुरासुंदरीस योग सामर्थ्य असल्याने ती आपले व वैद्यनाथाचे पूर्वीचे जन्म जाणून होती.
त्यानुसार देवी पार्वती रुपात असताना तिचे महादेवाशी लग्न झाले. त्यावेळचा किस्सा तिला आठवला.तो रामायण कालातला.
रावणाने सीतेचे अपहरण केले, रामाची अवस्था केविलवाणी झाली ती पाहून पार्वती महादेवांना म्हणाली,"ज्याचा पूर्णब्रह्म म्हणून तुम्ही उल्लेख करता त्याला आपली बायको कुठे आहे हे माहिती नसावे,त्याने केविलवाणे का व्हावे ?"
महादेव म्हणाले रामाने मानवी देह धारण केलाय म्हणून तो भावनांचे खेळ खेळतोय.
पार्वतीने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवलेले व व्याकुळतेने सीतेला हाका मारणा-या रामासमोर ती सीता बनून आली,लक्ष्मण फसला पण राम म्हणाला,"माते कशाला हे श्रम घेतलेस?"पार्वतीचा गर्व परिहार झाला पण तिला सीतारूपात पाहिल्याने भगवान महादेवाने तिच्याकडे पत्नी म्हणछन पहाणे बंद केले, या प्रसंगाची तिला आठवण होती म्हणून ती वैद्यनाथाशी विवाहास तयार नव्हती.
त्रिपारुसुंदरीने ठरवले कि अविवाहीत राहावे लागले तरी चालेल पण मागील जन्मी आपल्याला नाकारणा-याशी विवाह करायचा नाही म्हणून तीने तयार होण्यास विलंब लावला व मुहूर्त टाळला. महादेवांनी सर्वांना शाप देवून पाषाण बनवले.
आणखीन एका कथेनुसार,-
परशुरामाने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मिती केली. एक दिवस चौदा लोकांची प्रेते नजरेस पडली ती समुद्रातून काढून जिवंत केली.हीच चित्तपावनांची घराणी.परंतु चित्तपावनांना मुली देईना.वधू शोधन करत परशुराम आंबेजोगाईत आले,ग्रामस्थांनी एका अटीवर मुली देण्याची तयारी दाखविली ती म्हणजे तरुणांनी आणी त्यांच्या वंशजांनी देवीला कुलदैवत मानावे तेव्हापासून देवी कोकणस्थांची कुलदेवता झाली.

Comments

  1. सुंदर ब्लॉगर
    शुभेच्छा 🌹

    ReplyDelete
  2. सुंदर ब्लॉगर
    शुभेच्छा 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४