Skip to main content

अबला ते सबला" या हॅशटॅगचा ट्रेंड मागे पडला का ?
              खरं सांगायचे तर अबला म्हणजे स्त्री हा दृष्टीकोनच बदलण्याची खरी गरज आहे.
              अबला असणे ही प्रवृत्ती असते, मग तो पुरुषही असू शकतो.
              शक्ती, पैसा,ज्ञान याची कमतरता आणि भिडस्तपणाचा अतिरेक यामुळे व्यक्ती अबला बनते.
              एकत्र कुटूंब पद्धती असताना प्रत्येक कुटूंबात एकजण तरी असा असायचा की तो दिवसभर आख्ख्या कुटूंबाचा सांगकाम्या असल्यासारखा वावरायचा.
              एकत्र कुटूंब पद्धती हळूहळू संपुष्टात आली, घरातील एकजण जो कमी हुशार असेल,लहान असेल,भिडस्त असेल असा एकजणं घरं, इस्टेट आई-वडील यांची काळजी घेत घरी राहू लागला,बाकी सर्वजणं शहरात राजाराणीचे संसार थाटत असताना हा घरी काटकसरीचा संसार जगत राहतो.
              मग वेळ येते मनाने आणि शरीराने दूर असलेल्या यांना भावंडांना जोडणारा एकमेव रेशमीधागा तूटून जाण्याचा तेव्हा त्याला कळते आजपर्यंत आपण माझंमाझं म्हणून जपत होतो ते फक्त मृगजळं होते आणि तहान भागेल एवढे सोडाच हाताची ओंजळ ओली होईल एवढेही आपले नाही.
              एका सबलापणाची अबलपणाकडे,निर्बलपणाकडे अखंड एकाकी वणवण सुरु होते.
              रिकाम्या हातांनी आणि अथांग वाहणाऱ्या डोळ्यांनी.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४