दिवाळी,चिवडा आणि पोहे.
चिवड्याशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण समजला जातो, दिवाळी आली की धावपळ सुरु होते चिवड्यासाठी योग्य पोहे आणण्याची, कोणाला जाड आवडतात, तर कोणाला कोलमचे पातळ पोहे,आत्ताच्या फॅशनेबल युगात कोणाला नॉयलॉनचे एकदम पातळ पोहे हवेसे होतात.
पुर्वी पोहे कुटले जायचे, किती कष्टाचे काम असेल याचा आपण फक्त अंदाजच करु शकतो,लहानपणी आजूबाजूच्या बायका एकत्र येवून गणपतींच्या आधी थोडेसे तरी पोहे कुटायच्या,गणपतीला शिदोरी देण्यासाठी घरी कुटलेले पोहे आणि दही.
पेणच्या गोपाळराव साठे यांनी आपल्या भात गिरणीला जोडून पोहे कुटायचे मशीन बसवले व त्यात जाड पातळ हवे तसे पोहे काढून दाखवले.
ब्रिटीश व्हॉसईरॉयनी पोहे कुटायच्या मशीनचे आद्यजनक असे प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा सत्कार केला.
पोहे तर आपल्या अन्नाचा आवश्यक घटक बनले पण गोपाळराव साठे मात्र कधीच विस्मृतीच्या पडद्याआड गायब झाले.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment